पंचायत समिती निलंगा संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या पंचायत समितीने केला आहे. पंचायत समिती संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला पंचायत समितीमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणारे कामकाज हे पारदर्शक व गतीमान व्हावे, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या अभिप्राय व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.


नागरिकांशी सवांद

छायाचित्र दालन
 Image

पंचायत समिती निलंगा चे संकेतस्थळ कार्यान्वित होत असताना मला निलंगा डिजिटल युगामध्ये आल्याचा मनस्वी आनंद होत आहे. या संकेतस्थळामुळे नागरिकाशी संवाद करणे, नागरिकांना योजनांची माहिती मिळणे, विविध स्थळांची माहिती होणे, इ. बाबी सुलभ होतील. पंचायत समिती निलंगाच्या psnilanga.in या संकेतस्थळास हार्दिक शुभेच्छा!💐

छायाचित्र दालन
 Image

💐💐नूतन गट विकास अधिकारी मा.श्री सतिश जी पाटील साहेब यांचे स्वागत लिपिकवर्गीय संघटने तर्फे करण्यात आले.💐💐
स्वातंत्र्य दिनी संत ज्ञानेश्वर महाराज यांची सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्ताने दिंडी/पालखी सोहळ्याचे पंचायत समिती निलंगा घ्या वतीने आयोजन करण्यात आले.

*तालुका निलंगा* *जवाहर मंगल कार्यालय तगरखेडा* येथे पूरग्रस्तांसाठी *विशेष महाआरोग्य शिबीर* घेण्यात आले. सदर शिबिरास आरोग्य संचालनालय महाराष्ट्र शासन *डॉ. विजय कंदेवाड सर, संचालक -2पुणे* यांच्या *प्रमुख उपस्थितीत* व *प्रमुख पाहुणे मा. डॉ. सौ रेखा गायकवाड mam उपसंचालक आरोग्य सेवा लातूर, मा जि. आ. अधिकारी डॉ. बालाजी शिंदे सर, जि. शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपजी ढेले सर, अतिरिक्त जि. आ. अ. डॉ. बरुरे सर तसेच जिल्हा स्तरीय साथरोग टीम* यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. सदर प्रसंगी मा. संचालक डॉ. विजय कंदेवाड सर व उपस्थितीत सर्व टीम यांनी साथरोग प्रतिबंधात्मक उपाय, आजार, उपचार, अंसासर्गिक आजार, मानसिक ताण तणाव निर्मूलन, प्रौढ आरोग्य शिक्षण, सदृढ जीवनशैली आदीबाबत मार्गदर्शन केले. सदर शिबिरामध्ये पूरग्रस्त गाव तगरखेडा येथील गर्भवती महिला=46 असांसर्गिक आजार=129. अत्यावश्यक चाचणी=119. प्रौढ शिक्षण=84 दंतरोग तपासणी=31 नेत्ररोग तपासणी=108 एकूण =517 स्त्री, पुरुष तपासणी करण्यात आली. सदर शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी *मा.ता.आ. अधिकारी डॉ जाधव सर, (निलंगा) ,THO Dr. देशमुख सर(शि.अनंतपाळ), THO Dr. मोहीते सर (देवणी)* यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.



संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,पंचायत समिती निलंगा ©