माझी वसुंधरा अभियान

10,000 Seed Ball - (बीज गोळ्यांची) निर्मिती
जि.प.तांबरवाडी शाळेचा नाविण्यपूर्ण उपक्रम

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी 'माझी वसुंधरा अभियान' राबविण्यात येत आहे.निलंगा तालुक्याचे गट विकास अधिकारी मा.श्री सोपानराव अकेले साहेब यांच्या संकल्पनेतून,निलंगा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मा.श्री सुरेशराव गायकवाड साहेब, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री संतोषजी स्वामी साहेब यांच्या प्रेरणेने व शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री गणेशराव दाडगे साहेब,औराद केंद्राचे केंद्र प्रमुख मा.श्री पांचाळ एस.के. व औराद केंद्राचे केंद्रिय मुख्याध्यापक मा.श्री चिल्लाळे एस.आय. यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानांतर्गत जि.प.प्रा.शा.तांबरवाडी ता.निलंगा येथे दि.02 मे व 03 मे 2025 रोजी 10,000 SEED BALL (बीज गोळे) शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केले.आपटा,बांबू,चिंच,कांचन,शिवण,करंज,अभय,बेहडा,रिठा,साग,देवदार,लाल गुंज,पांढरा गुंज,चिल्हार,बेल,बोर,खैर आदी 30 प्रकारच्या बीयांपासून हे 10,000 सीड बाँल तयार करण्यात आले.पावसाळ्याच्या दिवसात हे Seed Ball नदीकाठी,ओढ्याकाठी,डोंगरावर,दरीत टाकण्यात येतील.या 10,000 Sees Ball पैकी 1000 रोपे जरी जगली तरी पर्यावरण संवर्धनासाठी खूप मोठं काम होणार आहे. SEED BALL (बीज गोळे) तयार करणे हा विद्यार्थ्यांसाठी वेगळाच अनुभव होता.अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांनी SEED BALL तयार केले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये पर्यावरण संरक्षणाचं व संवर्धनाचं मूल्य रुजण्यास मदत होईल.

माझी वसुंधरा अभियान
माझी वसुंधरा अभियान
माझी वसुंधरा अभियान

माझी वसुंधरा अभियान
माझी वसुंधरा अभियान
माझी वसुंधरा अभियान
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,पंचायत समिती निलंगा © 2025