पंचायत समिती निलंगा संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या पंचायत समितीने केला आहे. पंचायत समिती संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला पंचायत समितीमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणारे कामकाज हे पारदर्शक व गतीमान व्हावे, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या अभिप्राय व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.


नागरिकांशी सवांद

छायाचित्र दालन
 Image

पंचायत समिती निलंगा चे संकेतस्थळ कार्यान्वित होत असताना मला निलंगा डिजिटल युगामध्ये आल्याचा मनस्वी आनंद होत आहे. या संकेतस्थळामुळे नागरिकाशी संवाद करणे, नागरिकांना योजनांची माहिती मिळणे, विविध स्थळांची माहिती होणे, इ. बाबी सुलभ होतील. पंचायत समिती निलंगाच्या psnilanga.in या संकेतस्थळास हार्दिक शुभेच्छा!💐

छायाचित्र दालन
 Image

मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री आप्पासाहेब चाटे यांनी पं.स.कार्यालयास भेट देऊन आढावा घेतला.
ग्रामीण गृहनिर्माण (घरकुल), कृषि विभाग पंचायत समिती, महिला बालकल्याण , उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गट, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, गट शिक्षण पंचायत समिती, इ.विभाग व कार्यालयांना सन्मान चिन्ह व सहभाग प्रमाणपत्र मा.गट विकास अधिकारी श्री सोपानजी अकेले साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच, दिव्यांग कल्याण अंतर्गत दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले.
श्री सोपानजी अकेले, गट विकास अधिकारी व श्री अंबादास यादव केंद्रीय संचार ब्युरो चे क्षेत्रीय अधिकारी, सोलापूर यांच्या हस्ते दिव्यांग कल्याण अंतर्गत दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले.


संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,पंचायत समिती निलंगा ©