पंचायत समिती निलंगा संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या पंचायत समितीने केला आहे. पंचायत समिती संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला पंचायत समितीमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणारे कामकाज हे पारदर्शक व गतीमान व्हावे, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या अभिप्राय व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.


नागरिकांशी सवांद


दिनांक 09 मार्च 2026 रोजी सन्माननीय सभापती उपसभापती निवडीची विशेष सभा पिठासीन अधिकारी श्री शरद झाडके, उपविभागीय अधिकारी निलंगा व श्री प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार, निलंगा यांचे उपस्थितीत पार पडली. डॉ.सौ.सुनिता संतोष वाघमारे यांची पंचायत समितीच्या सभापती पदी व सौ.अश्विनी बालाजी माने यांची उपसभापती पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यावेळी झालेल्या अभिनंदन व सत्काराचे क्षण. . .

💐💐नूतन गट विकास अधिकारी मा.श्री सतिश जी पाटील साहेब यांचे स्वागत लिपिकवर्गीय संघटने तर्फे करण्यात आले.💐💐
स्वातंत्र्य दिनी संत ज्ञानेश्वर महाराज यांची सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्ताने दिंडी/पालखी सोहळ्याचे पंचायत समिती निलंगा घ्या वतीने आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६ तपासणी पथक पंचायत समिती शिराळा जि सांगली यांनी निलंगा तालुक्यातील ग्रामपंचायतीची तपासणी केली.


संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,पंचायत समिती निलंगा ©